पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ घरांतली कामें. कुरतडून टाकावा. बोटांनी ते काम करूं नये. वातीला मध्ये मध्ये खंड किंवा दांते राहूं देऊं नयेत; किंवा कोणत्या एखाद्या भागाला लहान मोठे टोंक करून ठेवू नये. असलेली वात संपायला आली किंवा फार मेणचट किंवा मळकी झाली ह्मणजे बदलावी. पावसाळी किंवा दमट हवा असली, तर वात घालण्यापूर्वी ती चांगली वाळवावी; आणि ती लावण्यापूर्वी तेल शोषून घेण्याकरितां थोडा वेळ मध्ये जाऊं द्यावा. वात घातल्यावर बर्नर तेलपात्रावर घट्ट बसवितांना त्यापासून वात आंत पिळवटू देऊ नये. आगकाड्या ज्यास्त खर्च होतील ह्मणून एका ल्यांपावरून दुसरा त्यांप लावणे बरेंच धोक्याचे आहे. एकदम सगळे ल्यांप लावून मग त्यांवर भराभर चिमण्या घालणेही तसेंच वाईट आहे. एकेक त्यांप एकेका काडीने लावून लागलीच त्याच्यावर चिमणी बसवावी. लावतांना वात खाली करावी. बर्नर ऊन झाला ह्मणजे ज्योत आपोआप मोठी होते. मग पाहिजे तर वात हळू हळू वर करावी. चिमणी घातल्याबरोवर एकदम ती वर करूं नये. ____ केरोसिन तेल अलीकडचे असल्यामुळे त्याच्या संबंधाने जुने आचार विचार कांहीं नाहींत. हा दिवा वाटेल त्या दिशेला तोंड करून ठेवावा. तथापि आरोग्याच्या दृष्टीने काही नियम पाळणे अवश्य आहेत.ते हे: (१) केरोसिन तेल खाण्यांत येऊ नये. ते विषारी नाही, तथापि त्यापासून मळमळते आणि वांति होते. (२) याचे काजळ किंवा धूर नाका-तोंडांत आणि विशेषेकरून डोळ्यांत जाणे चांगले नाही. त्याचे रज उडून पात्रावर पडू देऊ नयेत.