पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. १२५ wwwmarrrrrrrrrrrrraniw ल्यांपचे धातूचे भाग ह्मणजे बर्नर, तेलपात्र वगैरे चांगले पुसून साफ करावे. बर्नरवरील लहान लहान छिद्रे मळ सांचून बुजली असतील, तर ती सुईने साफ करावी. उंची प्रतीचे ल्यांपांत हलक्या प्रतीचे तेल भरूं नये. पाहिजे तर लिहिण्या-वाचण्याचे वेळी घेण्याचे ल्यांपांत व त्याचप्रमाणे उठण्याबसण्याच्या जागेच्या त्यांपांत उंची प्रतीचे आणि इतर ल्यांपांत हलक्या प्रतीचे तेल वापरावें. लहानशा घरांत जेथें पुष्कळ दिवे लावावयाचे नसतात, तेथे सगळ्याच दिव्यांतून उंची तेल वापरणे चांगलें. कित्येक ल्यांपांबरोबर त्यांत भरण्याच्या तेलाचे व त्यापासून पड. णाऱ्या प्रकाशाचे प्रमाण दिलेले असते. अशा वेळी त्या दिलेल्या प्रमाणानेच तेल भरणे योग्य होईल. तेलपात्रांत पूर्वीचे तेल असेल. व तें घामट झालेले असेल, तर ते काढून घेऊन हलक्या प्रतीच्या ल्यांपांत भरावें आणि तेलपात्र आंतून स्वच्छ करून मग स्वच्छ तेल त्यांत भरावें. तेलपात्र काचेचे असेल तर आंतलें तेल पिवळे झालेले व आंत केरकचरा पडलेला बाहेरून स्वच्छ दिसतो. तेलपात्र काचेचे नसले, तर मात्र थोडेसें तेल काढून पहावे लागते. वात बर्नरच्या बेताची असावी. ती सैल असू नये व घट्टही होऊ नये. ती तेलांत बुडालेली असली पाहिजे, पण तळाला पसरेल इतकी लांब नसावी. नाही तर तेलांतला साक तिच्यांत जमतो आणि पुढे ती जळण्यास निरुपयोगी होते. वातीचा जळका भाग खाली थोडी जागा ठेवून साफ ब सरळ कातरावा किंवा काडीने १ या प्रमाणाला क्यांडल पॉवर ह्मणतात. हे प्रमाण साधारणपणे चरबांच्या मेणबत्तीची चरबी दर तासास १२० ग्रेन किंवा जवळ जवळ ८ मासे जळून जो प्रकाश पडतो, त्यावर बसविलेलें असतें.