पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mm उपटत. १२४ घरांतली कामें, mmmmmmmmmmmmmmmmmm ती सगळीच वस्तु फार धुरकटली असेल, तर तिला राखेचें, गुळाचें किंवा चुन्याचे पाणी अथवा टरपेंटाईन चोळून स्वच्छ पाण्याने धुवावें आणि कोरडे करावें. रोज रोज चिमण्या धुण्याचे कारण नाहीं; किंबहुना रोज त्या धुवू नये हे चांगले. चिमण्या फार फुटतात त्या झिजून कधींच फुटत नाहीत. हेळसांडीनें अगर गैरसावधपणाने फार फुटतात. चिमण्या फुटण्याची काही कारणे लक्षात ठेवण्यासारखी आहे. १ चिमण्या चांगल्या जातीच्या काचेच्या नसणे. चांगल्या चिमण्या बहुधा पातळ व टणक असतात, आणि त्यावर डिटमार सारख्या चांगल्या नामांकित कारखानदाराचे नांव व खूण असते. जाड चिमणी दिसण्यांत सफाईदार दिसत नाही आणि लवकर फुटते. २ चिमणी ओली असतांच दिव्यावर ठेवून दिवा लावणे.. ३ दिव्याची वात मोठी असतां चिमणी वर बसविणे. व चिमणी घालतांच एकदम दिव्याची वात मोठी करणे. ४ वात नीट न कातरणे. अर्थात् ज्योतीचा झोक एकाच कडेला जाऊन ती बाजू अधिक तापून चिमणी तडकते. ५ ज्योत फार मोठी करणे. ६ वाऱ्याचा एकदम मोठा झटका लागणे इ०. चिमण्या फुटूं नयेत ह्मणून पुढील युक्ति करून पाहण्यासारखी आहे. चुलीवर थंड पाण्याचे पातेले ठेवून त्यांत कोया चिमण्या घालाव्या, आणि खालीं मंद आंच लावावी. हळू हळू ते पाणी कढत होऊ द्यावे. पाणी चांगले तापले झणजे खाली काढन निवत ठेवावे आणि गार झाले झणजे चिमण्या काढून चांगल्या पुसाव्या. व मग उपयोगांत आणाव्या.