पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २ रें. anna काठ्या किंवा काही अडगळीचे जिन्नस असतील तर ते उचलून त्यांच्या खालचाही केर काढावा. जाजम, सत्रंजी, बिछाईत वगैरे काढण्यास अवजड असलेले सामान न हालवितां त्यांच्यावरूनच केरसुणी अमळ दाबून केर काढावा, आणि आठचार दिवसांनी एकदां हे अवजड सामान काढून त्यांच्या खालचा केर काढीत जावें. का १२ लोकरीचे गालीचे, आसनें, किंवा केसाची कोणतीही आस्तरणें ( उदा० मृगचर्म, व्याघ्रचर्म इ. ) झटकू नयेत, किंवा त्यावर केरसुणी फिरवू नये. तसे केल्यास त्यांवरचे केस निघून जातील, व केरसुणीने त्यांतला केरही निघणार नाही. असे जिन्नस राठ केसांच्या किंवा दात्यांच्या ब्रशाने साफ करावे. काचेचें सामान पिसांच्या कुंच्याने हलक्या हाताने झाडावें. धातूचें, दगडी, लांकडी, वेताचे, कापडी, किंवा कागदाचें सामान (उदा० भांडी, टेबलें, कपाटें, पलंगाचे पाय, पुस्तकें वगैरे ) फडक्याने झाडून झटकून किंवा पुसून निर्मळ करावे. या कामासाठी एक स्वतंत्रच फडके करून ठेवावे. १३ सोंवळ्यांतल्या वस्तु ह्मणजे देवांचा देव्हारा, पापडलोणच्यांचे डबे किंवा बरण्या, व त्या वस्तु ठेवलेली जागा ह्मणजे देवघर, स्वयंपाकघर वगैरे, शिंदीच्या केरसुणीने ओंवळ्याने झाडूं नयेत. स्नानानंतर सोवळ्याच्या केरसुणीने (ह्मणजे हीरांच्या, गवताच्या, लव्हाळ्याच्या) किंवा मोळाच्या किंवा तसल्याच एखाद्या सोंवळ्यांत चालणाऱ्या पदार्थाच्या कुंच्याने झाडावी, आणि हा कुंचा सोंवळ्याच्या घरांतच भिंतीला खिळा ठोकून त्या खिळ्याला लावून ठेवावा. १४ केर काढतांना सामानाची जागा बदलू नये. केर काढण्यापुरतें तें उचलून केर काढल्यावर पुनः जागचे जागी ठेवावे. पाण्याची भांडी, पिकदाणी, तस्त, झाऱ्या, वगैरे घासण्यासाठी मोरीवर नेऊन ठेवावी.