पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. १२३ प्रत्येक दिव्याची तीन अंगे असतात. १ रिसीव्हर (तेलपात्र ) २ बर्नर ( वात ज्यांतून नेली असते तें तोंड ) व ३ चिमणी ( काचेची नळी ). पैकी बर्नर नेहमी धातूचा असतो, व चिमणी काचेची असते. तेलपात्र धातूचें, काचेचे किंवा चिनी मातीचे असते. काही दिव्यांना चिमणीवर आणखी ग्लोब असतो. भिंतीला लावण्याच्या दिव्यांचा प्रकाश चांगला फाकावा ह्मणून चिमणीच्या मागे रिफ्लेक्टर लावलेला असतो. हा काचेचा किंवा चकचकीत धातूचा असतो. कंदिलाचे प्रकारांत दिवसेंदिवस पुष्कळ च भर पडत आहे. या ल्यांपांना कापसाच्या साध्या वाती चालत नाहीत. त्या दड़स, जाड, नवारीसारख्या असाव्या लागतात. त्या गोल, चपट्या, जाड्या, बारीक, रुंद, अरुंद अशा अनेक प्रकारच्या, यंत्रांवर विणून तयार केलेल्या असतात. किटनसारख्या ल्यांपांत वातीचीही गरज नसते. तेलाचा ग्यास (वायु) होऊन तो जळावा अशी तजवीज त्यांत असते. केरोसिन तेलाच्या तेलवातीस पुढील सामान लागते:-तेलाची बाटली, तेल काढण्याचा पंप, नरसाळे, कातर, आगपेटी, फडकी, ब्रश, चुना किंवा चाक इ० प्रथम डब्यांतून पंपाने एका नसराळ्यांतून बाटलीत तेल ओतून घ्यावे, आणि डब्याचे तोंड बंद करून डबा दूर ठेवावा. तेल काढणे झाल्यावर पंप डब्यांतच राहूं न देतां बाहेर काढून पुसून ठेवावा, आणि मग त्या बाटलीने ल्यांपच्या तेलपात्रांत नरसाळे ठेवून त्यांतून तेलपात्रांत बेताचे तेल घालावें. ते अगदी तोंडोतोंड भरूं नये. काचेचें सामान-चिमणी, ग्लोब, रिफ्लेक्टर वगैरे काचेचें सामान झाडून त्यावरील केर, धुरकट, माती वगैरे काढून टाकावी. एकाद्या वस्तूवर डाग पडला असेल, तर तो ब्रशाने घासून काढावा.