पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ घरांतली कामें. आणि पाण्यापेक्षां पुष्कळ पटींनी पातळ व हलके असते. हलक्या प्रतीच्या तेलाला धूर व काजळ फार आणि घाणही असते. उत्तम प्रतीच्या तेलांत हे तिन्ही दोष नसतात. पेट्रोलच्या दिव्याच्या प्रकाशाइतका पांढरा, तेजस्वी आणि डोळ्यांना दिपविणारा प्रकाश कोणत्याही तेलाच्या दिव्याचा पडत नाही. बाहेरून येणाऱ्या तेलांच्या डब्यांवर कांहीं नंबर व ट्रेडमार्क ( व्यापाऱ्याचे खुणेचे शब्द किंवा चित्र ) असते. त्यांवरून त्यातले तेल कोणत्या प्रतीचे आहे, ते समजते. आसामांतलें, ब्रह्मदेशचे तेल या परदेशीय रिकाम्या झालेल्या डब्यांतून भरून येते.त्यामुळे व्यापारी लोकानां अजाण लोकांना सहज फसवितां येते. व्यापारी चांगल्या तेलांत वाईट तेल किंवा पाणी मिसळतात आणि डबाही पुरा भरीत नाहीत. एका डब्यांत ४ ग्यालन ( १८ शेर किंवा २४ मोठाल्या बाटल्या ) इतके तेल असते. चांगले तेल घेणे असेल तर पेटी किंवा डबा मूळचा बंद केलेला असेल, तो वजन करून घ्यावा. डबा उघडून हलके तेल घालून पुनः बंद केलेला घेऊ नये. डब्यावरील नंबर किंवा ट्रेडमार्क यांजवर भरंवसा धरूं नये. केरोसिनच्या दिव्यांना साधारणपणे ल्यांप व लहान टीनच्या डब्यांस चिमणी ह्मणतात. पण चिमणी हे नांव वस्तुतः वरच्या काचेच्या नळीचे आहे.केरोसीन तेल हवेत उडणारे व लवकर पेट घेणारे असव्यामळे त्याचे दिवेही अर्थात् चांगल्या बंदोबस्ताचे असले पाहिजेत. असे दिवे इंग्लंड, जर्मनी वगैरे परदेशांतून येतात. जर्मन माल भावाला कांहींसा किफायतशीर असतो. या दिव्याचे सामान्यतः चार प्रकार आहेत--१ टांगण्याचे, २ भिंतीला लावण्याचे, ३ भुईवर किंवा टेबलावर ठेवण्याचे आणि ४ कंदील ( हातांत धरण्याचे किंवा खांबावर बसविण्याचे ).