पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. १२१ wrwwwwwwwwwwwwwwwwwwwwim असतात. हे तेल मूळ झांत असतां घट्ट, साधारण प्रवाही, आणि अत्यंत प्रवाही, अशी त्याची तीन रूपे असतात. त्याची पेट्रोलियम, रॉक--आईल व नापथा अशी तीन निरनिराळी नांवे आहेत. झांतून काढल्यावर शुद्ध करण्यासाठी त्यांस कित्येक संस्कार करावे लागतात. या शुद्ध तेलास केरोसीन ह्मणतात. केरोसीनपेक्षां अधिक शुद्ध केलेलें तें पेट्रोल होय. - हे तेल हवेत उडणारे व फार ज्वालाग्राही आहे. त्यामुळे घरांत व कारखान्यांत हे फार जपून ठेवावे लागते. मुलांचा हात राकेलच्या डब्याला पोचणार नाही अशा ठिकाणी तो डबा ठेवणे जरूर आहे. तसेंच आगकाडीची काडी ओढून ती डब्यांत मुलांना टाकतां येणार नाहीं, अथवा कोणतीही ठिणगी उडून तेथे पडणार नाही, अशी खबरदारी घेणे अत्यंत अवश्य आहे. हिंदुस्थानांत हे तेल ३०।४० वर्षांपूर्वी प्रथम अमेरिकेहून आले. आतां त्याचा पुरवठा रशिया, ब्रह्मदेश व आसाम यांतूनही होतो.२ आसामचे आणि ब्रह्मदेशचे ही दोन्ही तेले साधारण सारखी असन गणाच्या मानाने बाहेरून येणाऱ्या तेलापेक्षा हलक्या प्रतीची आहेत. रशियन किंवा बाकू आईल या नावाने प्रसिद्ध असलेले तेल याहून वरच्या प्रतीचे आणि अमेरिकन तेल सर्वांत उत्तम असते. हलक्या प्रतीचे तेल पिवळ्या रंगाचे व उत्तम प्रतीचे तेल पांढरें स्वच्छ १. ब्रह्मदेशांत या तेलाच्या विहिरी आज २ हजार वर्षांपासून आहेत, पण त्यांचा खरा उपयोग आतां कळू लागला. आसामांतल्या तेलाचा शोध सन १८७१ मध्ये लागला, पण ते काढण्याचे काम १८९९. मध्ये सुरू झाले. अमेरिकेंतून या तेलाचा पुरवठा शे. १९ व रशियांतून शें. ७५ या प्रमाणात हल्ली होत असतो. मोठमोट्या रेलवेस्टेशनांवरून या तेलाच्या अजस्र टाक्या . बांधलेल्या असतात. यांतून डबे भरून तें गांवोगांव पाठविण्यांत येतें.