पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० घरांतली कामें. एरंडीचे तेल-दिव्यासाठी एरंडीचे तेल पातळ असेल तितकें चांगले. ते दुसऱ्या तेलापेक्षां फार कमी जळते. जवळ जवळ निमे मटले तरी चालेल. त्याचा प्रकाश मंद व शीतल असून ते काजळ धरीत नाही. या तेलांत थोडें राकेल मिसळले असतां तें जळण्यास चांगली मदत होते. समईचे तेलपात्र दिव्याने सारखें उष्ण राहत नाही. यामुळे हे तेल समईत चांगले जळत नाही. पंतीत जळतें. रेलवेवर हे राकेलाशी मिसळून टिनच्या चिमणींत जाळतात. याला जाड, बारीक कशीही वात चालते.रेलवेवर सुताच्या वातीने हे जाळतात. राकेल स्वस्त मिळू लागल्यापासून हे तेल फार मागे पडले आहे. खोबऱ्याचें तेल-हें कसेंही असले तरी चालते, मात्र इतर तेलांचे मिश्रण यांत उपयोगी नाही. याचा प्रकाश मंद व दृष्टीला शीतल असतो; पण तेजस्वी नसतो. हे बहुधा हंड्या, ग्लास, व कंदील यांतून जाळतात. याला वात ठोसर व जाड लागते. गलासांत अगोदर बरेचसे पाणी भरून मग त्यांत आपणांस पाहिजे तितके हे तेल भरतात. अशाने हे तेल ज्योतीच्या अगदी जवळ पोचते. याची वात सारणे झाल्यास ती चिमट्याने धरून वर ओढावी लागते. याचा उपयोग आतां थोडासा विद्यार्थी-मंडळीत व थोडासा श्रीमान् लोकांच्या घरी आराशीच्या वेळी होतो. कित्येक मंदिरांतूनही अद्याप हे दिवे लावतात. खनिज तेलें. राकेल-या तेलाचे बहुधा पाण्यासारखे पृथ्वीच्या पोटांत झरे १. हे झरे जमिनीखाली दोनशेपासून चारशे फूटपर्यंत खणल्यावर लागतात. चित स्थळी ते स्वतः जमिनीचा स्फोट करून फवाऱ्यासारखे उंच उडताना आढळतात.