पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. ११९ wwwwwwwwww २ दिव्याचे तोंड दक्षिणेला करूं नये; करणे झालेच, तर त्याच्या उलट दिशेला दुसरी एक वात लावून ठेवल्यास मग हरकत नाही. यमद्वितीयेला मात्र उकिरड्यावर दक्षिणेकडे तोंड करून पंती ठेवतात. . ३ वातींची संख्या नेहमीं सम ह्मणजे २, ४, ६, अशी असावी. विषम संख्या लावू नये. ४ जळता दिवा हातांतून पडणे मोठा अपशकून समजतात. दिवा पडल्या जागी दूध घालतात. ५ दिवा विझला ह्मणूं नये, गेला असें ह्मणावें. विझवावयास सांगावयाचे तर — निरोप दे ' किंवा ' मालव ' ह्मणावें. ६ दिव्याची वात बोटाने सारूं नये. सारलीच तर बोटाचे तेल अंगाला, भिंतीला किंवा दाराला पुसू नये. फडक्याला पुसून मातीने किंवा साबणाने हात धुवावा. ___ ७ फुकर वालून दिवा विझवू नये. वात थोडी मागें सारली ह्मणजे दिवा आपोआप जातो. फार तर पदंराने मालवावा. मात्र असें करतांना पदर पेटणार नाही, याविषयी फार सावधगिरी घ्यावी. ८ जेवतांना दिवा जाऊ नये. गेल्यास जेवण थांबवून कोणाकहून तरी दिवा पुनः लाववावा, व पानांतलें खाणे झाल्यावर उठावें. ९ सायंकाळी दिवा लावल्याबरोबर त्याला नमस्कार करावा, व तोंडाने ' शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदाम् । शत्रु-बुद्धिविनाशाय दीपोज्योतिर्नमोऽस्तु ते' असें मंगल ह्मणून, दिवा लावण्याच्या जागी बसलेल्या सर्व मंडळीने परस्परांस नमस्कार करावा. १० आषाढी अमावास्येला दिव्याची पूजा करावी. नवरात्रांतही देवीजवळ दिवा ठेवून त्याची पूजा करावी.