पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. तेल भरणें-दिव्यांत तेल बेताने भरावें. इतके की, तें सरासरी त्याच्या गळ्यापर्यंत येईल. तोंडोतोंड भरल्यास दिवा उचलतांना तें सांडेल, आणि खाली गळेल. राहिलेल्या तेलांतला गाळ, त्यांतल्या कीडमुंग्या, गाळणीने काढून टाकून भांड्यांत भरून ठेवावे. हे तेल पंत्यांतून किंवा बैठकीशिवाय इतर जागच्या दिव्यांतून पुनः भरतां येते. मातींची पंती कोरी असली, तर ती पहिल्या दिवशी बरेंच तेल शोषून घेते. तें तेल व्यर्थ जाते. यासाठी ही पंती पाण्यात भिजवून पाणी चांगले जिरले झणजे मग उपयोगांत आणावी. वात-दिव्याच्या बेताची वात घालावी. दिव्याच्या एका टोंकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरळ पुरण्याइतकी तिची लांबी असावी. पण वातीचे तीन चार जोड घालावयाचे असल्यास मात्र ती दिव्याच्या मध्यापर्यंत पोचेल, इतकीच लांब ठेवावी. नाहीतर वाती सारतांना एकमेकींत गुंततील. ज जळक्या वातीचे तुकडे तेलकट फडक्यांत घालून ठेवावे. वात जर मोठी व चांगली असेल, तर जळका भाग कातरून पुनः उपयोगांत आणितां येईल. प्रत्येक दिव्यांत वात सारण्यासाठी एकेक काडी अवश्य पाहिजे. ती काडी फार तेलकट झाल्यावर फेंकून देऊन नवी घालावी. दिव्यासंबंधाच्या कित्येक जुन्या समजुती व आचार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. १ मातीची पंती नुसत्या भुईवर ठेवू नये. तें अमंगल आहे. धनत्रयोदशीला मात्र पती रस्त्यावर नेऊन ठेवण्यास हरकत नाही. एरव्हीं प्रेत घरांतून नेल्यावर मात्र त्या जागी अशी पंती भुईवर ठेवतात.