पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. ११७ rmerammammmmmmmmmmmmmmmmmmmm - तेलवातीच्या जागी तेलाची तपेली, तेलाची झारी, व तेल काढण्याला उंच दांडयाची पळी वगैरे सामान ठेवावे. झारी आणि पळी दोन्ही साफ ठेवाव्या. तेलाने बरबट्टू देऊ नयेत. ही दोन्ही भांडी याच कामाकरितां स्वतंत्र ठेविल्यास रोजच्या तेलाच्या खर्चाचा अंदाज राहून कमजास्त झाल्यास कळेल, व त्याच्या कारणाचा शोध करतां येऊन फाजील खर्च होत असल्यास तो बंद करण्यास बरें पडेल. याशिवाय वाती करण्यासाठी चपटा दगड अगर सहाण, वातीसाठी कापूस, कातर, वात सारण्यासाठी काड्या, दिवे लावण्यासाठी आगपेटी, व तेलकट भांड्यावरले ओघळ पुसण्यासाठी चिंधी वगैरे वस्तु लागतात. या सगळ्या एका जागी ठेवाव्या. तेलवात करतांना प्रथम दिव्यांतलें तेल व वाती काढून त्यांच्या तळी आंतून व बाहेरून तेलकट फडक्याने पुसाव्या. पंती आणि दिवे. लावणे यांना येवढे पुरे आहे. समया व त्यांची ताटे वगैरे दुसऱ्या कोरड्या फडक्याने पुसावी. त्यांना थोडा देखील तेलकटपणा राहूं देऊ नये. आठवे चवथे दिवशी सर्व समया व तेलाची भांडी मातीने व राखेनें रगडून घासावी; ह्मणजे मेणचट होणार नाहीत. १ ही तेलकट फडकी व जळक्या वाती मागाहून चूल पेटविण्याच्या कामाला उपयोगी पडतात. प्रपंचाचे मुख्य धोरण हे असावें की, असलेल्यांत सर्व नीटनेटके करावयाचे, आणि कांहीं निष्कारण फुकट जाऊं द्यावयाचें नाही. उदा०-एक नवें धोतर किंवा लुगडे घेतले. तें नेसावयाचें तितके दिवस नेसून मग पांघरायला केलें. मग ते मुलांच्या अंथरुणाखाली घातले. पुढे त्याची फडकी केली. ती गाठोडी बांधायला, केर झटकण्याला, जोडे पुसण्याला वगैरे उपयोगांत आणिली. पुढे त्यांचे पोतेरें केले किंवा तेल पुसावयाला ती ठेविलीं, आणि शेवटी ती चूल पेटविण्याच्या कामाला आणिली. हा एक गरीबीच्या संसाराचा नमुना दिला आहे . ऐपत असली तर प्रत्येक कामाला निरनिराळे फडके ठेवावें. पण निष्कारण फुकट मात्र कोणतीही वस्तु जाऊ देऊ नये.