पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. . । समईच्या खालचा दांडा काढून टाकून नुसतें तोंड सांखळीने वर टांगतात. आतां विलायती चिमण्या व त-हेत-हेचे ल्याप यांनी समयांना बहुतेक मागे टाकिलें आहे. वात--ही कापसाची वळून करतात. सुताच्या वाती चांगल्या जळत नाहीत व चिंध्यांच्या फार लवकर जळतात. वात करतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या (१) वातीला कापूस नवा केर काढलेला व पिंजलेला असावा. जुना कापूस निःसत्त्व असतो व तो तेल चांगले शोषन घेत नाही. (२) वात फार जाड किंवा फार बारीक नसावी. दाभणाइतकी जाड असली मणजे बेताची होते. जाड केल्यास तेल अधिक जळतें.. बारीक केल्यास उजेड कमी पडतो. ती जाडीत एकसारखी व चांगली पीळ घातलेली असावी; नाहीतर तेलांत घातल्यावर फुगून ती विसविशीत होते व काजळी धरते. (३) वाती पुष्कळशा दिवसांच्या एकदम करून ठेवू नयेत. कारण, त्या इकडे तिकडे जातात.. (४) वाती एक दोनच करावयाच्या असल्या तर तळहातावर वळतां येतात. पुष्कळ असल्या तर सहाणेवर कराव्या; पण जमिनीवर करूं नयेत. वेळ व पद्धत-तेलवातीच्या कामाची एक जागा व सोयीप्रमाणे एक वेळ नेमलेली असावी. सकाळी केरवाऱ्याचे काम करतांनाच सर्व पत्या उचलून आणून नेमिलेल्या जागी एकाद्या कोना यांत किंवा लाकडी खोक्यांत ठेवाव्या; आणि संध्याकाळच्या केरवाऱ्याबरोबर. त्यांत तेलवात घालून त्या पुनः जागचेजागी नेऊन ठेवाव्या.