पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. ११५ तिळाच्या तेलाचे दिवे-तिळाचे तेल जाळण्याला त्यांत कशाचीही भेसळ करावी लागत नाही; आणि पाण्याचा स्पर्श झाला असतां तें तिडतिडते. हे तेल जाळण्याला दीपपात्र खुलें व खोलगट लागते. अशा दीपपात्रांचे पंती, लामणदिवा व समई असे तीन निरनिराळे प्रकार बहुधा आळढतात. पंती बहुधा मातीची व क्वचित् धातूची असते. ही बहुधा कोनाड्यांत व क्वचित् ठाणवईवर किंवा लहान वडवंचीवर ठेवतात, राकेलाचा प्रसार झाल्यापासून पंत्यांचा प्रचार बहुतेक गेला. आतां शौचकूपांत, जाण्यायेण्याच्या रस्त्यावर, जिन्यांत किंवा दिवाळीसारख्या दीपोत्सवाचे वेळी मात्र त्यांचा उपयोग करतात. । लामणदिवा बहुधा पितळेचा करतात. त्याला धरण्यास लांब दांडा असतो. हेही दिवे आतां बहुतेक प्रचारांतून गेले. हे दिवे आतां बायकांच्या हाती काचित् ओंवाळण्याचे वेळी किंवा लग्नकार्यांत करवल्यांच्या हातांत तेवढे दिसतात. एरव्ही कोठे फारसे दिसत नाहीत. - समई-ही पितळेची असते. श्रीमंतांच्या घरी चांदीच्या समया असतात. त्यांच्या घडणी दोन प्रकारच्या असतात-१ आवळ्याची झणजे दांड्याला आवळ्यांसारखी किंवा जोडव्यांसारखी वेटोळी थोडथोड्या अंतरावर असलेली; व २ सुरूची ह्मणजे सुरूच्या झाडाप्रमाणे खालून वर निमुळती होत गेलेली, पण डौलदार दांडा असलेली. समईला तेल घालण्यासाठी वर किंचित् खोलगट तोंड असते व त्याच्या घेराला वाती घालण्यासाठी पुढे आलेल्या खांचा केलेल्या असतात. या खाचांची संख्या नेहमी २।४।६ अशी सम असते. समईबरोबर तेलावर घालावयाची झांकणी, वात सारण्यासाठी वातसारणी ( धातूची काडी), कोजळी कातरण्यास चिमटा, समई ठेवण्यास खालीं ताट, वाऱ्यापासून ज्योतीचे रक्षण करण्यासाठी कापडी टोप (फानूस ), समई उंच ठेवण्यासाठी तिपाई इ० उपकरणे लागतात.