पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ घरांतली कामें. तळण्याला व खाण्यालाही घेतात. एरंडीचे तेल चांगलें शुद्ध व ताजे असेल तर त्याचा औषधाकडेही उपयोग होतो. जुनें व अशुद्ध तेल दिव्यांत जाळतात. हे मंद जळते. करडईचे तेल करडईच्या दाण्यांपासून काढतात. हे तेलही खाण्यास उपयोगी पडते. अलीकडे कापसाच्या सरकीचे तेल काढून विकतात. हे चांगले शुद्ध केलेले असले, तर तळण्याच्या उपयोगी पडते. पण दिव्यांत जाळतां येत नाही. कारण, ते इतर तेलांपेक्षां महाग पडतें. तेल काढणारे लोकांची आपणांत एक निराळी जातच आहे. तेली बैलाच्या घाण्यांत गळिताची धान्ये पिळून तेल काढतात. अलीकडे वाफेच्या यंत्रांनी तेल काढण्याचे कारखाने पुष्कळ ठिकाणी निघाले आहेत. _वर जी दिव्याच्या उपयोगाची तेलें सांगितली आहेत, त्यांत तिळाचे तेल प्रमुख आहे. याचा प्रचार बहुतेक सर्व देशांत आहे. एरंडेलाचा प्रचार गुजराथेंत व रेलवेवर आणि खोबरेलाचा कोंकण वं मलबार प्रांतांत व मोठाल्या शहरांत श्रीमान् लोकांच्या वाड्यांतून मात्र आहे. इतर जिनसांच्या तेलांचा उपयोग ती जेथे होतात, त्याच प्रांतांत विशेष होतो. वर सांगितलेल्या तेलांपैकी कोणतेच हवेत उडणारे किंवा एकदम पेट घेणारे नाही. कित्येक थंडीने गोठणारी आहेत. त्यामुळे ती ज्यात जाळावयाची ती दीपपात्रे सारखी उष्ण राहिली नाहीत, तर दिवा नीट जळत नाही. अशामुळे एकाच उद्भिज वर्गातल्या तेलांच्या दिव्यांचे तीन निरनिराळे प्रकार झाले आहेत, ते असे.-१ तिळाच्या तेलाचे दिवे, २ एरंडेलाचे दिवे, व ३ खोबरेल तेलाचे दिवे.