पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. ११३ annamaramananmananm झालेले) असे तीन वर्ग करतां येतात. यांपैकी पहिल्या दोन वर्गाचीच तेलें घरोघरी वापरण्यात येतात. प्राणिज तेले निघतात त्या स्थितीत ती उपयोगांत आणतां येत नाहीत. त्यांचे बरेंच शुद्धीकरण किंवा परिवर्तन करावे लागते, व तें करणें घरोघर शक्य नाही. शिवाय ही तेले इतरांपेक्षां महागही पडतात. ह्मणून उद्भिज व खनिज याच तेलांविषयीं या प्रकरणांत मुख्यतः सांगण्यांत येत आहे. उद्भिज्ज अथवा वनस्पतींची लेलें. ही सुमारे २५ वस्तूंची निघतात. पण ती सगळीच दिव्यांत जाळण्याच्या उपयोगी नाहीत. ज्यांचे तेल दिव्यांत जाळतात, असे जिन्नस ह्मणजे तीळ, खसखस, सरसू, कारळे, करडई, भुईमूग अळसी, खोबरें आणि एरंडी हे होत. तिळांत काळ्या तिळांचा उपयोग तेलाचे कामी विशेष करतात. तिळाचे तेल शेरी सरासरी अर्धा शेर निघते. त्याचा रंग लालसर पिवळा असतो. हे तेल खाण्याच्याही उपयोगी पडते. खसखशीचे तेलाचे प्रमाणही तितकेंच पडते. हे तेल पिवळट रंगाचे असते. सरसू ही एक मोहरीची जात आहे. तिचा दाणा मोहरीपेक्षां कांही मोठा व पिवळ्या रंगावर असतो. सरसूच्या तेलाला उग्र वास असतो. भुईमुगाचे तेल दक्षिणेत.विशेषतः कोल्हापूर, बेळगांव वगैरे प्रांतीं पुष्कळ होते. हे जुने झाले झणजे त्याला खवट वास येतो. कारळे हे काळ्या तिळासारखेच दिसतात, पण त्यापेक्षा थोडे लांबट असतात. यांचे तेल खाण्याच्या ही उपयोगी पडते. खोबऱ्याचे तेल कोंकणपट्टी, मद्रास, मलबार वगैरे प्रांतांतून जेथें नारळ पुष्कळ होतात तेथें होतें. खोबरें खवट असले तर त्याचे तेल पिवळे, खवट आणि चिकट निघते. या तेलाची पि भरून देशावर येतात. कारवार वगैरेकडे उत्तम खोबऱ्याचे ताजे तेल लोक