पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ घरांतली कामें. xxxwww व्ल्यांकेटाच्या रंगाचा भपका जाईल या भीतीने कितीही मळले तरी तें धुवावयाचें नाहीं, न धुतल्यामुळे त्याला घाण येऊ लागते व विसविशीत होते, तरी टाकवत नाही, असे करण्यापेक्षां धाबळ्या घेतलेल्या काय वाईट ? बिछान्यांतली सगळी वस्त्रे एकमेकांना शोभतील, शरीराचे रक्षण चांगले करतील व स्वच्छ ठेवता येतील अशी असली पाहिजेत. नुसते एकाच वस्तूच्या शोभेकडे पाहून चालावयाचे नाहीं. प्रकरण तेरावें. तेलवात. तेलवात किंवा दिवाबत्तीची तयारी करून ते लावणे हे घरांतल्या कामांपैकी एक महत्त्वाचे काम आहे. या कामाला दिवे, तेल, वाती, चिमण्या वगैरेंचे चांगले ज्ञान पाहिजे. तेलवात करण्याच्या कामांत जाळण्याचे तेल व ते ज्यांत जाळावयाचें तो दिवा यांच्या गुणधर्माची चांगली माहिती पाहिजे. तेलाचा योग्य पात्रांतच उपयोग केला पाहिजे; नाही तर भलताच परिणाम व्हावयाचा ! उदाहरणार्थ, तिळाचे तेल चिमणीत घातले तर दिवा जळावयाचा नाही, आणि राकेल समईत घालून वात पेटविली तर एकदम भडका होईल, ह्मणून तेले, वाती, आणि दिवे यांची माहिती वेगवेगळी न देतां प्रत्येक जातीच्या तेलाच्या वर्णनाचे पोटी ती. दिली आहे. तेलांच्या गुणधर्माप्रमाणे त्यांचे उद्भिज ( वनस्पतीपासून काढलेले), खनिज ( खाणींतून निघालेलें ) व प्राणिज ( प्राण्याच्या शरिरापासून