पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. wwwwwwwww (१०) खाटापलंग उचलण्यासारखे असतील ते उचलून जागच्या जागी किंवा बाहेर ओटीवर, अथवा त्यांत ढेकूण झाले असल्यास अंगणांत उन्हांत ठेवावे. भिकार हौस-ज्याप्रमाणे इतर बाबतींत त्याचप्रमाणे बिछान्याचे संबंधांतही कित्येकांच्या ठायीं श्रीमंतासारखे आपल्या ऐपती बाहेर सामान घेण्याची भिकार हौस असलेली दिसते. बिछाना शरीर रक्षणाकरितां लागतो, हे लक्षात न ठेवतां ते शोभेकडे ज्यास्त लक्ष देऊन आपल्या पैशाचा निष्कारण चुराडा करतात. अवश्य वस्तूला ज्यास्त किंमत पडली तरी हरकत नाही, ती चांगल्या प्रतीची घेऊन शरीराचे व आरोग्याचे रक्षण अधिक करावें, पण निवळ शोभेसाठी ऐपती बाहेर खर्च करणे हा वेडेपणा आहे. मच्छरदाणी पाहिजे असे वाटते, पण ती मच्छरें व पिसा खुशाल आंत येतील इतक्या मोठाल्या भोंकांच्या जाळीची किंवा रेशमी गोठ लाविलेली घेतली किंवा घेऊन ती नीट वापरली नाही अथवा फाटेल ह्मणून तिचा उपयोग कधी केला नाही, किंवा मळली तरी धुण्यास दिली नाही, तर ती घेण्याकरितां दिलेली किंमत फुकट गेली असे होत नाही काय ? तसेंच गादीचे. लग्नांत किंवा न्हाणवल्या मुलीला बिछाना देतांना एखाद्या बाईनें मश्रूची गादी करून दिली झणजे ती आपली हौस पुरली असे समजते. पण मश्रूच्या गादीवर अंथरण्याला पुरेशा चादरी कोठे तिच्याने घेववतात ? तिचे लक्ष सगळे बाहेरच्या शोभेकडे असते. मश्रूच्या गादी ऐवजी तिने जर चांगली लांबरुंद व मऊ अशी दोनतीन पंजाबी कांबळी घेऊन मुलीला दिली तर ती तिच्या किती उपयोगी पडतील ? ब्ल्यांकेटाचे ही तसेच. चांगले निखालस लोकरीचे उंची जातीचे ब्ल्यांकेट ८।१० रुपये खर्चुन घ्यावयाचे, पण बिछाना मळकट, पांघुरणे मळकी,