पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० घरांतली कामें. mm (३) पांघरण्याच्या वस्त्राच्या घड्या घालाव्या. त्यांनी बिछाना फार मोठा व उचलण्यास जड होत असेल तर त्यांची वळकुटी निराळी करावी. (४) शाली, रग, रेशमी आणि जरीची नाजुक वस्त्रे बिछान्यांत गुंडाळू नयेत, किंवा पसरून ठेवू नयेत. त्यांच्या नीट घड्या घालून त्या दांडीवर ठेवाव्या. (५) बिछान्याची वळकुटी अशी करावी की आंतली वस्त्रे बाहेर लोंबू नयेत. (६) नेहमींच--प्रण विशेषतः पावसाळ्यांत आणि हिवाळ्यांत सर्व वस्त्रे वाऱ्यावर आणि शक्य असेल तेव्हां उन्हांत घालावी. ज्यांचा रंग जाण्याची भीति असेल त्यांच्यावर अभ्रा किंवा पातळसें वस्त्र घालून ती उन्हांत ठेवावी. (७) बिछाने पुष्कळ आणि जागा सकुंचित असेल तर आळीपाळीने एकेक बिछाना अशा रीतीने उन्हांत घालावा. (८) बिछान्यांतली वस्त्रे वरचेवर धोब्याकडे धुण्यास द्यावीत अगर घरी धुवावी. (९) बिछान्यांच्या वळकुट्या जेथल्या तेथेच खाटापलंगावर ठेवण्याची सोय असेल तर तशा ठेवाव्या. तशी सोय नसेल तर उचलून दुसरीकडे ठेवाव्या. त्या सांदीकोपऱ्यांत ठेवू नयेत. भुईवर ढीग करूनही ठेवू नयेत. कोपऱ्यांत उभ्या करूं नयेत. एखाद्या घडवंचीवर किंवा आढे मजबूत असल्यास त्याला तखते बांधून त्यावर ठेवाव्या. डद्देश हा आहे की भिंतीवरून संचार करणाऱ्या प्राण्यांना त्यांत शिरतां येऊं नये; त्या दडपल्या जाऊ नयेत, आणि त्यांस चोहीकडून हवा लागावी.