पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. १०७ wwwmanawwwwwwwwwwwwwww ___८ गच्चीवर आंथरुण घालावयाचे असेल व ती तापलेली असेल, तर अगोदर तिच्यावर पुष्कळ पाणी ओतून ती थंड करावी. ९ आंथरूण घालतांना त्याचा पायाकडील भाग अंमळ खाली आणि डोक्या कडला थोडा उंच होईल असे घालावें. १० रात्री निजण्याच्या वेळचे विशेष कपडे झणजे पंचा, सदरा, टोपी ही पलंगाच्या कठड्यावर किंवा खुंटीवर घडी घालून ठेवावी. ११ उशाला किंवा पायथ्याला खुंट्यांवरून बोचकी वगैरे न ठेवतां, निजण्याची जागा जितकी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवावी. निजण्याच्या खोलीतले सामान-निजण्याच्या खोलीत. बहुधा पुढील सामान ठेवावे लागतें (१) पिण्याचे पाण्याचा तांब्या-याला झारीसारखें पक्कया झांकणाचे भांडे चांगले. एका दालनांत अगर खोलीत जितकी माणसे निजावयाची त्यांना एक दोन वेळ पुरेल इतके पाणी भरून ते भांडे कोनाड्यांत, स्टुलावर, किंवा दुसऱ्या एखाद्या उंच जागी ठेवावें. (२ ) सांडपाण्याचे भांडे-एकदोन सांडपाण्याचे तांबे आणि पाणी भरलेली बादली (बालटी )हीं मोरी असल्यास मोरीजवळ ठेवावी. (३) दिवा-रात्रभर पुरेल इतके तेल घातलेला दिवा निजण्याच्या खोलीत ठेवावा. निजतांना त्याची ज्योत कमी करावी. केरोसीन ( राकेल ) च्या मोट्या दिव्याने खोली गरम होते व शिवाय दिवा भडकण्याची भीति असते. राकेलच्या दिव्यावर नेहमी चिमणी असावी. नाही तर दिव्याचे काजळ व धूर ही नाका-कानांत व घशांत जातात. तें अपायकारक आहे.