पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ घरांतली कामें. (४) हातकंदील-निदान एखादी मेणबत्ती व आगकाड्यांची पेटी ठेवावी. आगपेटी उशाला किंवा बिछान्यांतून दाबून ठेवू नये. सेफ्टी म्याच अशा रीतीने ठेवण्यास हरकत नाही. (५) पंखा-उन्हाळ्यांत वारा घेण्यासाठी पंखा लागतो. (६) फुलांचे गजरे-कित्येक हौशी व ऐपतदार लोकांना निजण्याचे वेळी सुगंधि फुलांचे गजरे जवळ ठेवावेसे वाटतात. हे बिछान्यावर न ठेवितां पलंगाच्या दांड्यांस किंवा दुसरीकडे वारा त्यावरून निजणाराकडे येईल अशा रीतीने ठेवावे. अगदी जवळ न ठेवण्याचे कारण कित्येक कीटक सुवासाने फुलाकडे आकर्षिले जाऊन त्यांत स्थान करतात. ढेकूण, पिसा वगैरेंचा बंदोबस्त-ढेकूण, पिसा, मच्छरे वगैरे प्राण्यांपासून निजणारास फार त्रास होतो. हा त्रास काही उपायांनी कमी करता येतो. अशा उपायांपैकी काही येथे सांगतों--(१) भिंतीचे पोपडे खरवडून त्या पातळ सारवाव्या. पोपडे येऊ देऊ नयेत. ( २ ) पलंगाची नवार उकलून तो उन्हांत ठेवावा. त्याच्या भेगा भरून काढाव्या व तो कढत पाण्याने धुवावा. त्याच्या सांधींतून राकेल किंवा नरम फेस येणारा साबू आणि रसकापूर यांचे समभाग मिश्रण लावावें; टटाईन तेलांत कापूर मिळवून ते मिश्रण लावावें. (३ ) खाट किंवा पलंग उन्हांतच राहूं देऊन रात्री घरांत आणिल्यावर पुनः त्यांत ढेकूण शिरूं नयेत ह्मणून त्यांच्या पायांखाली पाण्यामें भरलेली दगडी भांडी ठेवावी. ( ४ ) मच्छरें बहुधा ओल, घाण, किंवा धूळ, माती यांच्या आश्रयाने राहतात. ह्मणून त्यांची आश्रयस्थाने प्रथम मोडावी. (५) मच्छरदाणीचा उपयोग करावा. (६) कारेफडीचे झाड खुंटीला किंवा आढ्याला अडकवून ठेवावें. (७)