पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ घरांतली कामें. AAAA बिछाने ज्याच्या त्याच्या निजण्याच्या जागी संध्याकाळी नेऊन ठेवावे. जाण्या-येण्याच्या वाटेंत मात्र ठेवू नयेत. बिछाना घालतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या १ बिछाना पूर्व-पश्चिम किंवा दक्षिणोत्तर सरळ घालावा. उसें पूर्वेस किंवा दक्षिणेस असावें. दक्षिणेस पाय होतील असा घालू नये. अशी जुनी रीत आहे. २ बिछाना भिंतीस अगदी लागून घालू नये. त्याचे कोणतेही टोंक उंबऱ्यांत येईल, किंवा जिन्याच्या खालच्या पायरीस लागेल असा घालू नये. ३ वर उभा पाट किंवा तुळई अथवा विजेचा पंखा, टांगलेला दिवा, अथवा शिंके असेल, तर त्याच्या खालीं बिछाना घालू नये. ४ बिछान्या शेजारी बीळ असू नये. असल्यास तें पके बुजवावें. ____५ रात्री झाडाच्या छायेखाली किंवा त्याच्या मुळापाशी बिछाना घालू नये.विशेषतः ज्या झाडाला सुवासिक फुले येत असतील अथवा ज्यांतून मध पाझरत असेल, अथवा ज्याच्या मुळाशी मुंगळे, मुंग्या वगैरे नेहमी राहत असतील, अशा झाडांपाशी तर मुळीच घालू नये, ६ वाऱ्याचा झोत अंगावर येईल असा-ह्मणजे दाराच्या किंवा खिडकीच्या समोर-बिछाना घालू नये. दारे पुष्कळ असतील तर हवेच्या बाजूचे दार जरूरी असेल तेवढा वेळ उघडे ठेवून बाकीची बंद करावा. कोणतेही दार उघडे ठेवणे सुरक्षित नसेल, तेव्हां तें सहसा उघडे ठेवू नये. झोप येऊ लागली झणजे लावता येईल असा विचार करून आळसूं नये. झोंप केव्हां लागेल, आणि धोका केव्हां होईल, याचा काही नेम सांगता येणार नाही. ७ वाळवी (उधई ) किंवा ओल असेल तेथें, अथवा मोरीच्या किंवा शेतखान्याच्या जवळ बिछाना घालू नये.