पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. १०५ mmmmmmmm उशा, वगैरे सर्व कांहीं नीट झटकावी. अशाकरितां की, दिवसभर दबून राहिलेल्या वस्त्रांच्या सर्वांगाला एकदा तरी स्वच्छ हवा लागावी. दुसरें असे आहे की, विंचवासारखे जीवजंतु अंथरुणांत शिरून चिकटून बसतात; तेही अशा झटकण्याने काढतां यावे. ब्रशाने साफ करण्यासारखी वस्त्रे न झटकतां ब्रशानंच साफ करावी. जसे-शाली, रग वगैरे. कामाची वेळ--हे काम निजण्याच्या वेळी करण्यावर ठेविलें असतां आयत्या वेळी धांदल होते आणि त्याचा जो मुख्य उद्देश तो साधत नाही. ह्मणून हे काम संध्याकाळी केरकचरा काढण्याच्या कामाबरोबरच उरकून घ्यावे. हे बरें. बिछान्यांतील सर्व वस्त्रे झाडून झटकून झाली झणजे आंथरण्याची ती नीट सारखी आंथरावी. त्यावरील चादरीचे सळ मोडावे. पांघरण्याची वस्त्रे एकाहून अधिक असतील तर ती नीट बरोबर जोडावी. त्यांत रोज फेरफार होत नसले, तर हवा असल्यास एक दोन कोपऱ्यांस दोरा घालावा म्हणजे ती विसकटणार नाहीत. - चादर,अभ्रा, पांघरण्याची वस्त्रे वगैरेपैकी जी मळाली असतील ती धुण्यास काढून त्या जागी दुसरी घालावी. पांघरुणांपेक्षां आंथरण्याची आणि त्यांतही विशेषतः उशांचे अभ्रे फार भळतात. ह्मणून ते वरचेवर बदलले पाहिजेत. बिछान्यांतली वस्त्रे वेळोवेळी उन्हांत टाकावी. एकादें वस्त्र फाटले तुटले असेल तर ते शिवून नीट करावें. तसें न केल्यास ते रात्रीचे हातापायांत अडकून ज्यास्त फाटण्याचा संभव आहे. बिछान्यांची किंवा त्यांतल्या वस्त्रांची अदलाबदल झणजे एकाचें दुसऱ्यास असें ह्येऊ देऊ नये; ज्याचे त्यासच ठेवावें.