पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ घरांतली कामें. wwwmarwari दाणीची असली पाहिजेत. या भोंकांतून वाऱ्याचा संचार मोकळेपणाने होईल, अशी ती भोंके पाहिजेत. मच्छरदाणी फक्त पलंगालाच लावण्याची सोय असते. कित्येक लोक मच्छरदाणीच्या ऐवजी कापडाची खोली करवितात. ढेकणांचा उपद्रव फार असतो, तेथें कित्येक लोक कापडाची खोली करून तिला छताप्रमाणे तळालाही कापड लावतात. झणजे हा एक कापडाचा मेणाच होतो. याच्या आत बिछाना घालतात किंवा बिछान्यावर या खोलीचे तळ ठेवतात. याच्या योगाने ढेकणांना आंत येतां येत नाही. हिला ढेकुणदाणी ह्मणतात. पलंगपोस वगैरे. पलंगपोस ही एक मोठी लांब-रुंद चादर असते. बिछाना सर्वदा पसरून ठेवावयाचा असला झणजे दिवससा हा त्याच्यावर आच्छादनासाठी घालतात. हा बहुधा मळक्या रंगाचा असतो. बिछान्याची वळकटी करण्यास सतरंजी असते. पण तीही मळू नये ह्मणून कित्येक लोक तिच्यावर जुनें जाजम किंवा गोणपाट लपेटतात. प्रवासांत बचावासाठी त्यावर कांबळे, मेणकापड किंवा रोगणी कापड गुंडाळतात. लहान प्रवासी बिछान्यासाठी होल्ड-ऑल नांवाचे थैल्यासारखें एक वेष्टण मुद्दाम केलेले असते, ते फार सोयस्कर असतें. बिछाना विस्कळित होऊ नये, त्याची केलेली वळकटी सुटूं नये आणि ती सहज उचलता यावी ह्मणून ती काढणीने बांधतात; किंवा बकल लाविलेल्या वादीने आवळतात. या वादीला Bedstraps ह्मणतात. बिळाना घालणे--विछाना नेहमीं पसरून ठेविलेला असो किंवा वळकटी करून ठेविलेला असो, त्यावर निजण्यापूर्वी गादी,