पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mm प्रकरण १२ वें. १०३ mmmmmmmmmmmmmwwwwww मटला पाहिजे. यांत ढेकणासारख्या जंतूंना बसण्यास फारशी जागा मिळत नाही हाही एक फायदा आहे. पलंगांना खुरांच्या खाली भुईवर टेकणारी लोखंडाची लहान चक्रे बसविली असतां घरांतल्या घरांत इकडून तिकडे ता फिरवतां येतो. लोखंडी पट्टयांचे किंवा नवारीचे पलंग विलायतेहून येतात, किंवा इकडेही कित्येक कारखान्यांतून होतात. पण हे गरीब माणसांच्या उपयोगाचे नाहीत. हे इस्पितळांतून, विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगांतून, किंवा शिपायांच्या बराकींतून वापरतात. पितळेचे व चांदी सोन्याचे पलंग हे श्रीमंत, सावकार व राजेरजवाडे यांच्यासाठी असतात. म . झोपाळा. हे पलंगाचंच एक रूप आहे. खाली खुरांच्या ऐवजी याला वर टांगण्यास कड्या किंवा दोऱ्या लावतात, इतकाच फरक.यावर बसून झोके घ्यावे किंवा निजावें. दोन्ही कामाला हा येतो. खाट किंवा बाज. . हे पलंगाचे गांवठी रूप आहे. खाट झणजे ओबडधोबड व हलक्या किंमतीचा पलंग. नवारीच्या किंवा पट्टयांच्या ऐवजी खाटेला सुंभ, मुंज, किंवा सुतळी विणलेली असते. किंमतींत कमी असून उपयुक्ततेत ती पलंगाची बरोबरी करते. ह्मणून गरीब लोक बहुधा खाटा वापरतात. उत्तरहिंदुस्थानांत खाटांचा प्रचार सर्वत्र आहे. खाट उचलण्यालाही हलकी असते. मच्छरदाणी. हिचा उपयोग माशा, मच्छरे वगैरेंचे निवारण हा आहे. अर्थात् या कीटकांना आंत येतां येणार नाही इतकी बारीक भोंके मच्छर