पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ घरांतली कामें. कानपुरासारख्या ठिकाणी ही यांचे कारखाने निघाले आहेत, त्यांत काही निवळ लोकरीची असतात, पण कित्येक सूतमिश्रित असतात; त्यामुळे पुष्कळ वेळां लोक फसतात. कित्येक रग फारच मऊ आणि सुंदर रंगाचे असतात. पलंग. पलंग हा एक सुखोपभोगाचे साधन आहे. ह्मणून विरक्त, यति, व विधवा स्त्री यांना त्याचा उपयोग शास्त्रांनी निषिद्ध मानिला आहे. पण काही जागी पलंगाची खरोखर अवश्यकता असते. निजण्याची जागा दमट किंवा लोणा आलेली असेल किंवा अतिशय उष्णतेमुळे जमीन तापलेली असेल,अशा ठिकाणी पलंगाशिवाय गति नसते. जेथें जीव-जंतूंची भीति असते, तेथेही पलंग अवश्य पाहिजे. - पलंगाचे नवारीचा, लाकडी पट्ट्यांचा, कॅनव्हासचा, वेताचा, तारेचा, पितळी,चांदी-सोन्याचा इ० अनेक प्रकार आहेत. नवारीचा पलंग असला तर त्याची नवार चांगली नवी पाहून घ्यावी. कुजकी नवार लवकर तुटते. नवार चांगली घट्ट विणीची, चिवट व चांगली. ताठ राहील अशा रीतीने पलंगाला विणलेली असावी. नाही तर ती. लवकर ढिली होऊन पलंगाला मध्येच झोल पडतो, आणि निजणाराला चांगले सुखाने निजतां येत नाही. लांकडी किंवा लोखंडी पट्ट्यांचा पलंग एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्यास तितका सोयीचा नसतो. कानव्हस (पडम ) चा पलंग नेण्याआणण्यास फार सोयीचा पण टिकाऊ नसतो. वेताच्या पलंगाचे वेत वारंवार तटतात. व ते पुनः विणून घेणे हे बरेच खर्चाचे काम असतें. तारेचा पलंग ( वायर मॅट्रेस ) मऊ असून टिकाऊही असतो. त्याला आरंभी किंमत ज्यास्त पडते खरी, पण एकंदरीत हाच सोयीचा