पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. arrrrrrrrrrrrrrrran शेवटीं तो कल्हई वगैरे करतांना हातीं धरण्याच्या कामी पडतो. त्याचे सूत काढून त्याचे रकटें ( सुताडा ) बनवितात. अलीकडे ब्लीचिंग नावाची एक धुण्याची कला निघाली आहे, तिच्यायोगें कसलीही घाणेरडी रुई स्वच्छ व नरम करता येते. ही रुई काचेचे व चांदी--सोन्याचे जिन्नस बाहेर पाठवितांना त्यावर गुंडाळण्याच्याही उपयोगी पडते. कांबळे- हे लोकरीच्या पांघरुणांला सामान्य नांव आहे. हे लोकरीचे करतात. लोकरीच्या उच्च--नीचत्वाप्रमाणे याला पुढील निरनिराळी नांवें मिळाली आहेत.गांवठी कांबळे-हें धनगर करतात. हे बहुधा दोन अरुंद पट्ट्या जोडून केलेले असते. याला १॥ पासून ३ रुपयांपर्यंत किंमत पडते. पंजाबी कांबळे हे गांवठी कांबळ्यापेक्षा थोडें नरम आणि बारीक धाग्याचे असते.हे पंजाबांत अमृतसर, लुधियाना वगैरे ठिकाणी बनते. याला ५ रुपयेपर्यंत किंमत पडते. लोई, धाबळ व दुस्सा--यांत थोडा फरक असतो. लोई पांच सहा हात व धाबळ २४ हातपर्यंत लांब असते. धाबळीपेक्षा लोई आणि लोईपेक्षा दुस्सा पोताने जाड व दणगट असतो. धाबळी बिकानेर येथे व लोई आणि दुस्से पंजाबांत चांगले होतात. शाल-हें धाबळीचेच उत्तम रूप आहे. या काश्मीरांत चांगल्या होतात. फ्रान्स, जर्मनी, इटली वगैरे युरोपांतील देशांहूनही त्या येतात. परदेशी शाली रंगाला भपकेदार असतात, पण पोत काश्मीरी शालीसारखें नसतें बनात, ब्ल्यांकेट, व रग ही जाड, नरम, आणि मूल्यवान् असतात. बनातीची तर ठाणेच येतात. ब्ल्यांकेटें व रग ही लहान लांबी--रुंदीची पुष्कळ असतात. ह्मणून ही घेतांना आपल्या बेताची पाहून घ्यावी, ही बहुधा परदेशी असतात.अलीकडे