पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० घरांतली कामें. काठी किंवा जरीकाठी उपरणी किंवा पातळे ही येतात. माशा, चिलटे वगैरेंचे निवारण तर व्हावें, पण उकडूं नये, ह्मणून त्यांचा उपयोग उन्हाळ्यांत करतात. मध्यम पांघरूण---या वर्गात पासोड्या येतात. पासोड्या बहुधा खादीच्या करतात. हाताने सूत काढलेल्या कपड्याची पासोडी, चांगली ऊबदार व टिकाऊ असते. जड पांवरूण-या वर्गात दुलई, रजई, कांबळी, रग, इ० येतात. दुलई, रजई, व गोधडी ही रुईच्या प्रमाणावरून व कापडाच्या जातीवरून एकालाच तीन निरनिराळी नांवे पडली आहेत. दुलईचे कापड बारीक पोताचे असून तिला चौफेर संजाब आणि शेवटी मगजी लाविलेली असते. हीत रुई पक्का सवा किंवा दीड शेर इतकी असते. दुलई उंची कपडा घालून व गोटा लावून आणि अन्य प्रकारे शृंगारतात. हिची किंमत दोन रुपयांपासून ५०६० रुपयांपर्यंतही असते. रजईचे कापड मध्यम पोताचे असून, हीत रुई ॥२॥ शेरांपर्यंत. असते. दिल्ली, लखनौ, मुरादाबाद वगैरे उत्तर-हिंदुस्थानांतल्या कित्येक ठिकाणी रजया चांगल्या मिळतात. लेप किंवा गोधडे यांचे कापड जाड असून त्यांत रुई पांच शेरांपर्यंत असते. गोधड्यांत कापसाच्या ऐवजी कपड्याच्या चिंध्याही भरलेल्या असतात. दुलई सामान्यतः ३ वर्षे, रजई ४।५ वर्षे आणि लेप ८।१० वर्षेपर्यंत चालतो. ही पांघरुणे फार वर्षे लोटली झणजे खराक होतात. मग त्यांच्या खोळी काढून टाकून रुई दुसऱ्या एखाद्या कामी लावावा. रुई प्रथम पांघरुणांत आणि मग अंथरुणांत वापरल्याव