पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. - rainine mmmmmmm श्रीमंत लोक थंडीच्या दिवसांत उबेसाठी चादरीखालीं फ्लानेल किंवा ब्ल्यांकेट घालतात व उन्हाळ्यांत घामाने गादी खराब होऊ नये ह्मणून टिशू पेपर ( बारीक पारदर्शक व चिवट कागद ) उशीखाली दाबून कमरेपर्यंत चादरीखाली घालतात. । चादर चोहोंकडून गादीच्या खाली वीतभर दाबून घालता येईल येवढी लांब-रुंद असावी. अभ्रा. उशी मळू नये ह्मणून तिच्यावर अभ्रा घालावा. कोणी शोभेसाठी त्याला झालरही लावतात. साधा अभ्रा अंमळ ढिला व झालरदार उशीचा अंगाबरोबर असतो. अभ्याचे तोंड कसे किंवा गुंड्या लावून बंद केलेले असते. उशांना अभ्रे घालणें अवश्य आहे. नाही तर यांना घामाची व तेलाची घाण लवकरच येऊ लागते. पांघरूण. . __पांघरूण मुख्यत्वेकरून थंडीच्या निवारणासाठी असते. थंडीचे मान नेहमी बदलत असल्यामुळे पांघरूणही त्या मानाने बदलावयास पाहिजे. पांघरुणांत ऊब धरून ठेवण्याचा, तें अंगावर सुखाने घेतां येण्याचा, नरमपणाचा, आणि लांब-रुंदपणाचा, इतके गुण असले पाहिजेत. पांघरुणाचे १ हलकें, २ मध्यम व ३ जड, असे तीन वर्ग करतां येतील. हलके पांघरूण-यांतही पुनः सामान्य आणि विशेष असे दोन प्रकार आहेत. सामान्य पांघरुणांत स्वच्छ धुतलेले उपरणे किंवा अंगवस्त्र आणि चौघडी यांचा समावेश होतो. ही रोज बहुधा धुतली जातात. धुतलेल्या वस्त्रांत ऊब राखण्याची शक्ति अधिक असते. विशेष प्रकारांत दुपेटे, रुमाल, रंगित पातळ छिटें, पातळ रेशीम