पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. र उशी. उशीचा खरा उपयोग मानेपासून वर डोक्याच्या भागाला टेका देणे हा आहे. तथापि तिचा उपयोग आणखी पायाखाली आणि हाताच्या पंजाखाली ठेवण्यासही करतात. या उशांना अनुक्रमें मानउशी, मांडउशी आणि गिर्दी ह्मणतात. मानउशी व मांडउशी चौकोनी आणि गिर्दी गोल असते. उशीत रुई किंवा लोकर यांच्या ऐवजी पंपाचे साह्याने ती चांगली तुडुंब भरेपर्यंत हवा भरतात, आणि तोंडाला फिरकीचे बूच गच्च बसवितात. उशीचे काम झाले झणजे बूच काढतात. हणजे तिच्यांतली हवा निघून जाऊन तिचा चिपटा होतो.ही प्रवासांत फार सोयीची असते. ही उशी रबाची असते. चाँदर. गादीवर घालण्याची चादर खादी नादरपाट ( मांजरपाट) आयरिश बेड लिनन, किंवा विलची करतात. चादरीचे कापड कसलें ही असो, ते इतकें जाड आणि घट्ट विर्णीचे असावे की, अंगांतून गळणारा घाम चादरीतून झिरपून गादीपर्यंत पोहचूं नये; किंवा गादीतल्या द्रव्याची ऊब अंगापर्यंत पोचण्यास अडथळा होऊ नये. -- लहान मुलें रात्रींची बिछान्यांत देहधर्म करतात, आणि त्यामुळे खालची गादी ओली होऊन खराब होते. ह्मणून मुलांच्या बिछान्यांत चादरीखाली नरम मेणकापड किंवा रोगणी कापड घालून चादरीच्या वर अंमळ जाड व ओलावा शोषून घेणाऱ्या कापडाची लहानमोठी फडकी घालण्याची चाल आहे. . १ हिलाच कोणी पलंगपोस आणि पलंगपोसाला सरपोस ह्मणतात.