पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. पर आणि लोकर कापसापेक्षा अधिक फुगीर असल्यामुळे, ज्यास्त जागा व्यापतात. ह्मणून हे जिन्नस कापसाच्या बजनाच्या पाऊणपटीने घातले ह्मणजे पुरेत. केस मात्र फार थोडी जागा व्यापतो, ह्मणून ते कापसाच्या सर्वा किंवा दीडपटीनेही लागतात. गादी सतरंजीप्रमाणेच पुष्कळ दिवस टिकते. मात्र ती व्यवस्थेने वापरली पाहिजे. नाही तर लवकर खराब होते. गादी फार दबली किंवा तिला पाणी लागले तर तिचा ऊबदारपणा कमी होतो. ह्मणून तिसऱ्या चवथ्या वर्षी गादीची खोळ धुववून व आंतील द्रव्य साफ करवून ती पुनः भरावी लागते. दोन चार माणसांना बसण्यासाठी पुरेशा लांबी रुंदीची गादी असते तिला हातगादी ह्मणतात. बिछान्याची गादी एरव्ही बसण्यास घेऊ नये. खुर्चीच्या बैठकीवर बसण्यासाठी किंवा मागे टेकण्यासाठी गादी असते, तिला इंग्रजीत कुशन ह्मणतात. हिच्यावर रेशमी किंवा जरीचे फुलेंवेलींचे काम केलेले असते. मोठ्याल्या दालनांतून बिछाइतीवर अंथरण्यासाठी मोठमोठ्या गाद्या असतात. त्यांस गदेले ह्मणतात. ' श्रीमंतांच्या येथे जिन्याच्या पायऱ्यांवरूनही गाद्या पसरलेल्या असतात. गादींत कित्येक लोक काथ्या घालतात. अशा गाद्या नवारीच्या ऐवजी पलंगालालांकडी दांड्या किंवा पट्ट्या असतात, त्यांवर घालण्याच्या उपयोगाच्या असतात. त्या बिछान्याच्या उपयोगी नाहीत. गरीब लोक ऐपत नसल्यामुळे गाद्यांत कापसाच्या किंवा लोकरीच्या ऐवजी चिंध्या भरतात. प्रवासांतल्या गाद्या लांबी-रुंदीत व त्याचप्रमाणे जाडींतही कमी असाव्या ह्मणजे त्या सोयीच्या होतात.