पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्या जगण्याचे रिती रिवाज, कायदे कानून, रूढी, परंपरा, कुटुंब व्यवस्था बदलते आहे. आधी मुलींना, स्त्रियांना खूप कमी अधिकार होते, बंधने होती, आज - चित्र बदलतंय. मुली, स्त्रिया सगळीकडे वावरतायत. सर्व प्रकारची कामे करतात. मुली ९) शिकतायत, मुलींना अधिकार आहेत, हे आता मान्य केले जात आहे. जगाची गती वाढली आहे. काही तासात हजारो मैल दूरच्या ठिकाणी पोहचता येतं. फोन आणि इंटरनेट मुळे हजारो मैल दूर बसलेल्या माणसाशी बोलता येते. वैज्ञानिक बदलाचा परिणाम आमच्या विचारांवर आणि व्यवहारावर पडतो आहे. नित्य नविन बदलणा-या दुनियेच्या गती बरोबर ताळमेळ बसवतच जगता येईल, बदलापासून दूर राहता येणार नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात अड्चणी निर्माण होतील. | काही वयस्क मंडळी संस्कृती, रिती रिवाजाच्या नावाखाली बदलाला विरोध करतात. त्यांची इच्छा असते की,युवा