पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपलं शरीर सतत बदलतंय, रक्त वाहत आहे, श्वास चालतो आहे, हृदय धडकत आहे. आपण लहानाचे मोठे होतोय, मोठयाचे म्हातारे होवू, एक दिवस हे शरीर हालचाल करणे थांबवेल. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा वेगळेच होतो, आता आपण वेगळे आहोत आणि जेव्हा मोठे होवू तेव्हा वेगळेच असू. आपली आवड, विचार, भावना सगळं बदलतंय, बदलत राहतंय. | आपल्या कुटुंबात पण बदल होतोय. छोटी मुलं मोठी होतायत, मोठयांची लग्नं होतायत. त्यांना मुलं होतायत. म्हातारी माणसं मृत्यूमुखी पडतायत. समाज बदलतोय, देश बदलतोय, ग्रामीण भागात बदल घडतोय, शहरांमध्ये लोकसंख्या वाढतेय. आधी आपल्या देशावर इंग्रज राज्य करत होते. तेव्हा लोकसंख्या कमी होती. आता आपण स्वतंत्र देश आहोत. दिडशे कोटी लोक आपण आपल्या देशात रहातो.