पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पिढीने जुन्या पुरान्या परंपरानुसार वागले पाहीजे, त्या चुकीच्या असो किंवा बरोबर. संस्कृती ही वाहती नदी आहे, ती नवी आहे. पिढी दर पिढी ती बदलत आहे. म्हणून आपण जीवनाचा पहिला नियम समजून घेतला सतत बदल. सृष्टीचा दुसरा नियम - विविधता निसर्गामध्ये विविधता आहे. लाखो प्रकारची झाडे, पाने फुले, पक्षी, किडे, जनावरे, रंग, गंध, पर्वत, दया, डोंगर, खोरे, वाळवंट, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा वेगवेगळ्या प्रकारची शेती, धान्य, किती विविधता. । तशीच विविधता माणसामाणसामध्ये आहे. माणसांचे दिसणे, आवड, निवड, काम, विचार करण्याची पद्धती, पाशाख, परंपरा, धर्म, खाणे, पिणे, अगणित प्रकारची विविधता. । | निसर्गाने विविधता निर्माण केली आहे, पण भेदभाव नाही. विविधता आणि भेदभाव यात फरक आहे. विविधतेत भिन्नता असते, वेगळेपण असते. तुम्ही आणि मी वेगवेगळे आहोत. जगामध्ये एकसारखी माणसे नाहीत. प्रत्येक माणूस वेगळा आणि सुंदर आहे.