पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपली गोष्ट सांगण्याची कला | तुमचं म्हणणं तुम्ही प्रभावीपणे / आपल्या तेव्हाच सांगू शकाल जेव्हा ती गोष्ट तुम्ही गोष्टींचे निट समजुन घेतली असेल आणि तुम्हाला महत्व ती महत्वाची वाटत असेल. एकाग्रतेने गोष्ट सांगणे सोपे असते. काही लोक बोलताना समजा तेच शब्द परत परत बोलतात. इकडे तिकडे बघतात. मध्ये मध्ये अडखळतात. या सर्व गोष्टी आपले म्हणणे सांगण्यामध्ये अडथळा आणतात. ऐकणा-यालाही विचलीत करतात. आपण तीन प्रकारे संवाद करत असतोः १. निष्क्रीय पध्दती - म्हणजे आपणच आपल्या म्हणण्याचा आदर करत नाही. कोणत्या तरी दबावाखाली दिसतोही आणि बोलतोही, केवळ दुस-याच्या गरजा आणि दुस-याचे विचार यांना महत्व देतो, स्वतःला कमी लेखतो. स्वतःच्या गरजा आणि अधिकाराचे भान देखील नाही. प्रत्येक चुकी बद्दल स्वतःला दोष देतो. त्यामुळे सतत दुःखी आणि ताणात राहतो. 44