पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. आक्रमक पदधती- निष्क्रियतेच्या बरोबर उलटे या प्रमाणे संवाद करणारे लोक इतरांच्या विचाराचा सन्मान करत नाही. ते केवळ आणि केवळ आपल्या विचारांना, गरजांना आणि भावनांना महत्व देतात त्यांची बोलण्याची पद्धत आक्रमक आणि अपमानजनक असते. प्रत्येक गोष्टीचा दोष ते | दुस-याला देतात. ते बोलतात जास्त, ऐकून कमी घेतात. ते एकतर्फीच बोलत राहतात. दूतर्फी संवाद होउच देत नाहीत. ३. दृढता किंवा निश्चयपूर्वक संवाद पद्ध्ती | या संवादात स्वतःच्या आणि इतरांच्याही मतांची कदर केली जाते. दोघांच्याही भावनांना, विचांराना आणि गरजांना लक्षात घेतलं जातं. या संवाद पद्धती मध्ये ऐकलंही। जातं आणि बोललंही जातं. प्रामाणिकपणे आपल्या आणि समोरच्यांच्या चुकांची मोकळया पद्धतीने चर्चा केली जाते. या पद्धती मध्ये आपल्या अधिकारांची आणि समोरच्याच्या अधिकाराचीही पायमल्ली केली जात नाही.संवादाच्या या पद्धतीत दुतर्फा संवाद केला जातो, चांगला समन्वय साधला जातो. त्यामुळे चांगले नाते निर्माण होवू शकते. ही संवाद पद्धती शिकण्याचा प्रयत्न करा. ही संवाद पद्धती जीवनात खुप उपयोगी पडेल.