पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनाने, कानाने आणि डोळ्याने ऐका। चांगल्या संवादासाठी ऐकता येणे खूप महत्वाचे आहे. ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्याचे म्हणणे नीट कान देवून ऐका. त्या व्यक्तिकडे पाहत, मान हालवत, डोळ्यांची उघडझाप करत एका चांगल्या संवादाची सुरूवात करता येते. ऐकताना शब्दांसोबत बोलणा-याचे शरीर बोलत असते, तिकडे लक्ष दया. बोलत असताना दुसरीकडे पाहणे, वाचत राहणे, हाताची उलट सुलट हालचाल करणे योग्य नाही. तुम्ही बोलत असताना इतरांनी असे केले तर तुम्हाला वाईट वाटेल ना. लेखी चिनी भाषेत चिन्हांचा आणि चित्रांचा वापर केला जातो. ऐकणे या शब्दासाठी तिन चिन्ह किंवा तसविरी लिहील्या जातात,कान डोळे आणि हृदय. म्हणजे नीट ऐकण्यासाठी कान, डोळे आणि हृदय हया तिन्ही ही गोष्टी पाहीजेत. सुनना