पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तर तुमचा काही दोष नाही. प्रत्येकाची योग्यता आणि कौशल्ये वेगवेगळी असतात. काही लोक अभ्यासात हुशार असतात, काही लोक खेळात उस्ताद असतात, तर काहींना कॉम्प्युटर मध्ये गती असते. काहींना दुस-यांच्या गप्पा ऐकायला आवडतात, काहींना छान किस्से सांगता येतात. आपली योग्यता किंवा मर्यादा याचीच तर ओळख करुन घेत जगायचं आहे आपल्याला. नेहमी दुस-यांची तुलना करुन दुःखी नाही व्हायचं, स्वतःला दूषणं नाही दयायची. तुमची स्पर्धा इतरांबरोबर नका करू, तर ती स्वतः बरोबर असू दया.. आपलं काम हळूहळू सुधारत गेले पाहिजे, जे आपल्या जवळ आहे त्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे. ०२८९-९०२०२००९-44 तुम्ही जसे आहात, तुम्हाला जे मिळाले, २॥ जे कौशल्य तुमच्या जवळ आहे * त्याच्याविषयी कृतज्ञता दाखवा कित्येकदा भावनांचे हत्यार करुन लोक काही मिळवण्याचे प्रयत्न करतात. काही भावनांचे नाटक करुन आई वडील, मित्रांना घाबरवून