पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डिप्रेशन आपल्याला सोडायला मागत नाही. काही गोष्टी किंवा व्यक्ती त्यांच्यातील आपली गुंतवणूक मर्यादा सोडते. अशा वेळी विशेष तज्ञ किंवा डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जसे शरीर आजारी पडते तशी भावनात्मक गडबड होऊ शकते. जर तब्येत बिघडली तर आपण जसे डॉक्टरांकडे जातो तसेच भावनिक गडबडी मुळे त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाण्यास लाजायचे नाही. जरुर पडल्यास डॉक्टरांची मदत घेण्यास कमीपणा नाही तर शहाणपण आहे किशोर अवस्थेमध्ये यशस्वी झालंच पाहिजे याचा दबाव खूप असतो. आई- वडील, शिक्षक सगळ्यांच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा असतात. जर तुम्ही यशस्वी झाला नाही तर ओरडा खावा लागतो. पण जर तुम्ही पुरेशी मेहनत घेतली असेल आणि अपयश आले असेल.