पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावनांमध्येही कंप निर्माण होतो. कधी वर, कधी खाली. परंतू भावनांशिवाय माणूस नाही. तो । रोबो बनून जाईल. उत्साह नाही, राग नाही, खिदळणं नाही, रडणं नाही, यंत्र मानव बनून जाईल. जीवनाला भावना आवश्यक आहेत. | आम्ही जीवनातील भावनांचं महत्व जाणतो. काही भावना आनंद देतात. पण काही भावना त्रासदायक असतात. परंतू भावना चांगल्या किंवा वाईट नसतात. प्रत्येक भावनेचं आपलं एक महत्व आणि जागा आहे, राग आपल्या जागी आहे,दया आपल्या जागी आहे , दु:ख आपल्या जागी आहे. आनंद आपल्या जागी, रडणं, हसणं आपल्या जागी. यातल कोणी चांगल किंवा वाईट नाही. भावना लपवून ठेवण्या ऐवजी, त्या दाबून टाकण्या ऐवजी त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांच्याशी बोला, त्यांच्या विषयी बोला, त्याचं विश्लेषण करा. जर तुम्हाला राग आला असेल तर तुमच्या आत मोठे वादळ उठलेय, थांबा आणि ते वादळ समजून घ्या. असं का होतंय ? तुम्ही वेडे तर नाही, एवढा राग आलाय ? काही कारण तर असेल. काय कारण आहे ? राग येणे चूक नाही. राग येणे वाईट नाही, पण राग सांभाळायचा कसा हे समजले पाहिजे.