पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुमच्यातील काही लोक सहजपणे इतरांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतात. जे जाणवतं ते बोलता तुम्ही, पण काही जण सगळं काही मनात दाबून ठेवतात. राग आलाय की आनंदी आहेत काहीच कळत नाही. आपल्या समाजात मुलांना भावना लपवायला । सांगतात. रडू नको, आपली कमजोरी दाखवू नको, सर्व परिस्थितीत आपण कणखर आहोत असा दिखावा निर्माण करायला सांगतात. भावनिक होण्याला कमजोरी मानली गेलीय. मुली आणि बायका भावनिक असू शकतात,कारण त्यांना कमजोर मानलं ना. कोणी मुलगा जर रडायला लागला ना तर त्याला म्हणतात काय मुली सारखं रडतोस. + मित्रांनो, भावना आपल्या आंतरमनाचा आरसा असतात. आपल्या विषयी त्या सांगत असतात. आपण जर त्यांना नीट ऐकलं आणि समजून घेतलं तर भावना म्हणजे गाडीचे > इंजिन, त्या इंजिन शिवाय कार कशी चालणार? आपले वागणे आपल्या भावनांशी जोडलेले आहे. जेव्हा आपल्यात जोश आहे, उत्साह आहे, प्रेम आहे तेव्हा आपण एकदम स्वत:ला ताकदवान महसुस करतो. जेव्हा आपल्या मनात एकटेपणा कमीपणाची भावना येते तेव्हा शरीर पण शक्तीहीन होतं. |