पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण आपलं संतुलन हरवून बसतो. २-४ वेळा दीर्घ श्वास घेवून आपण स्वतःला सांभाळू शकतो का? कोणा विषयी घृणा किंवा प्रेम जेव्हा वाटतं तेव्हा एक तर आपण वेडं असणार, नाही तर या भावना नीट समजून घेवून आपण व्यवहार केला नसणार, भावना आपल्या मनात निर्माण होण्यावर आपलं नियंत्रण नाही. त्यांना समजून घेवून नीट वागणं आपल्या हातात आहे. जसे आपण इतर कौशल्य शिकतो तसे यावर ही थोड़ी मेहनत केली पाहिजे. आपल्या भावना सांभाळण्याचे कौशल्य शिकले पाहिजे, त्याला म्हणतात भावनात्मक परिपक्वता. भावना दाबून टाकायच्या किंवा नाकारायच्या नाहीत भावना शून्य मशीन नाही बनायचं. यंत्रवत नाही बनायचं, भावना दाबायच्या पण नाहीत. असे म्हणतात कि भावना दाबून टाकणे हे विष समान आहे. राग, घृणा, ईष्र्या, दाबून टाकल्याने आपल्या मनात पसरते. कित्येक वेळा त्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. आपण आजारी पडतो. किंत्येकदा त्याचा स्फोट होऊ शकतो. म्हणून भावना समजून घेऊन त्याचा समतोल ठेवता आला पाहिजे.