पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| लहान-मोठ्या पडणा-या प्रश्नांची उत्तरंही आमची आम्हीच किंवा आमच्या मित्र मैत्रिणी बरोबर धडपडून शोधली. मित्र मैत्रिणी म्हणाल तर त्यांनाही त्याच अडचणी होत्या. त्याचीही माहीती, समज कमीच होती. त्यामुळे अनेक कटू अनुभव यावाटेने चालताना मिळाले. म्हणून आम्ही विचार केला की आमच्या अनुभवाच्या आधारे तुमच्याशी गप्पा माराव्यात, तुम्हाला काही गोष्टी सांगाव्यात. । काही वर्षापुर्वी आम्हीपण किशोरी होतो,तरुण होतो. तुमच्या सोबत जे घडतंय त्या गोष्टी आमच्या सोबत घडल्या आहेत. आमचं रक्त पण सळसळतं होतं. आम्हालाही काही नविन करुन दाखवायचं । होतं. ओळख स्वतःची निर्माण करायची होती. मनात असाच गोंधळ उडाला होता. घरच्यांविषयी | आमच्याही तक्रारी होत्या. डोक्यात अनेक प्रश्न थैमान घालत होते. बोलण्या सांगण्या सारखं खूप काही होतं, पण आम्ही ते आतल्या आत दाबून टाकलं होतं. आता मागे वळून बघताना आम्हाला हे जाणवतं. हे घुसमटणं ( जिज्ञासा ।। ।। ।। ।। ।। ।। ।। । । । । । । । ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।