पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक गरिब माणूस असतो.तो आपल्या गरिबीला दुषणं देत नेहमी दुःखी रहायचा. एक दिवस तो एका श्रीमंत माणसाकडे आपल्या गरिबीची कहाणी सांगत होता.तेव्हा तो श्रीमंत माणूस म्हणाला, 'तुझं एक फुफ्फुस मला दे , तुला हवा तेवढा पैसा देतो. माझी दोन्ही । फुफ्फुसे खराब झाले आहेत. एकाच फुफ्फुसावर मी जास्त दिवस नाही जगु शकणार, गरीब माणूस म्हणाला, | 'अरे, मी तुला माझे फुफ्फुस कसे देवू?' मग श्रीमंत माणूस म्हणाला,' बरं फुफ्फुस नाही तर नाही मग तुझे डोळे विक. माझ्या | तरुण मुलासाठी तुझे डोळे हवेत. तु मागशिल तेवढे पैसे मी तुला देईन' त्या दिवशी त्या गरीब माणसाला कळलं की तो किती धनवान आहे. आपल्या सगळ्यांकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. इतरां बरोबर तुलना करुन दुःखी होवून बसण्यात काहीच अर्थ नाही. | | तुम्ही स्वतःचा आदर कराल तरच इतर तुमचा आदर करतील. स्वतः सक्षम बना, मग पहा लोक तुमचा आदर करतील, तुम्हाला सन्मान मिळेल. खूप मोठे मशहूर शायर आणि विचारवंत मोहम्मद इक्बाल म्हणाले की, । खुद ही को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले, । खुदा बंदेसे खुद पुछे, बता तेरी रजा क्या है?