पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवन कौशल्याचे काही महत्वपूर्ण पैलू जीवन कौशल्य हा विस्तृत विषय आहे, त्याचे काही पैलू आपण समजुन घेणार आहोत. १. स्वत:बरोबरचे आणि इतरांबरोबरचे नाते. | सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की तुमचे तुमच्या बरोबर स्वस्थ आणि सुंदर नाते असणार. तुम्ही एक उत्तम व्यक्तीमत्व आहात, अगदी तुमच्यासारखं दुनियेत दुसरं कोणी नाही. तुम्ही मौल्यवान आहात. स्वतःचा आदर करा, स्वतःला सुरिक्षत करा. स्वतःला ओळखा, जाणा आणि स्वतःची पूर्ण काळजी घ्या. आपली तब्येत चांगली ठेवा म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही. स्वत:ला सक्षम बनवा आणि खुप गोष्टी करण्यासाठी लायक बना. आपले गुण आणि मर्यादा, दोष समजून घ्या. या सर्वच गोष्टी जीवनाचा भाग आहेत. आपलं शरीर, आपलं मन, आपली बुदिधमत्ता, आपली परिस्थिती याविषयी घृणा वाटू देवू नका. जे मिळालंय त्या विषयी समाधानी रहा. त्यांच्यातूनच जीवन घडविण्याचा निर्धार करा. आपल यश आणि आपले गुण यांचे मुळे डोक्यात हवा जावू देवु नका आणि आपले अपयश आणि मर्यादा यांच्यामुळे कमीपणा ही मानु नका)