पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इकबाल म्हणताहेत की, तुम्ही स्वतःला एवढं सक्षम बनवा की देव देखील तुम्हाला विचारेल की बोल तुला काय पाहिजे? म्हणजेच स्वतःचं नशीब आपण स्वतः घडवू शकतो. म्हणून आपल्या चूका, आपल्या मर्यादा आणि आपली परिस्थिती याला दूषणं देत न बसता, स्वतःवर नाराज न होता, आपण माणूस आहोत, माणसंच चुका करतात, माणसांनाच मर्यादा आहेत हे समजून घेतले पाहिजे. तुमच्या कुटुंबातील माणसं, शिक्षक, मित्र हे देखील माणसंच आहेत. ते देखील चुका करतात. म्हणून मैत्रीणींनो, स्वतः विषयीची समज वाढवा आणि दुस-यांना ही समजून घ्या. हां, जर तुम्ही विशेष आणि महत्वपूर्ण असाल तर इतर ही विशेष आणि महत्वपूर्ण आहेत. म्हणून स्वतः बरोबर इतरांचाही आदर करा. त्यांना समजून घ्या,त्यांची काळजी घ्या, त्यांच्या बरोबरचं नातं जोपासा ज्ञानी लोक म्हणाले आहेत - इतर सजीवांपेक्षा आपण वेगळे नाही. सुख दुःख सर्वांची, सारखी असतात. हे परस्परांवर अवलंबून असणं, हे सहजीवन, हे। नात्यांचे बंध समजून घ्या आणि स्विकारा, दुनियेतील सगळी सुखे त्यांनाच मिळतात जे इतरांच्या सुखासाठी झटतात। * आणि दुनियेतिल सगळी दुःखे त्यांच्याच वाटयाला येतात जे फक्त स्वत:च्याच सुखाचा विचार करतात.