पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खरं आणि परिपूर्ण ज्ञान तेच जे कोणीतरी सांगीतलं म्हणून आपण मानत नाही तर ते आपण स्वतः पारखून मिळवलेलं असते खरं ज्ञान ते आहे जे आपण स्वतः शोधतो आणि अनुभवतो बोधीसत्व प्राप्त केल्यावर म. बुद्धांनी ते ज्ञान इतरांना वाटलं, तेव्हाही ते म्हणाले, मी सांगतो म्हणून स्विकारु नका, मी जे सांगतोय ते तपासून घ्या. पाली भाषेत ते म्हणाले ॥ "एहि परिस्को ।” 'आओ और देखो। परिक्षण करा, मेंदुची कवाडे खुली ठेवा आणि सत्य तपासून पहा, हीच ज्ञानार्जनाची वैज्ञानिक पद्धत आहे. खरे गुरु तेच आहेत जे आपल्या भाषणातून कमी आणि जीवनातून आणि चारित्र्यातून जास्त शिकवतात. आपण त्यांना पाहून, ऐकून,त्यांच्या सोबत राहून बरेच शिकत असतो. तुम्हाला असे गुरु, मित्र, अश्या जेष्ठांचा शोध घ्यावा लागेल, ज्यांच्या जीवनाकडे पाहून तुम्हाला शिकता येईल.