पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवन कौशल्य, चांगली पुस्तके, खेळाचे मैदान, नाटकाचे स्टेज, गप्पा मारताना कुठेही शिकता येतं. हे अनुभवावर आधारित ज्ञान आहे. जीवन जगताना इतरांसोबत हे कौशल्य शिकता येते. जीवनाकडून शिकायचं. जीवनासाठीच हे ज्ञान आहे. पुस्तकी शिक्षकांकडून हे ज्ञान आणि हे कौशल्य नाही शिकता येणार. जे लोक पुस्तकी ज्ञान जीवनाशी जोडून शिकतात आणि शिकवितात, अशाच गुरुकंडून जीवन कौशल्य शिकता येते. जे ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला सक्रीय भागीदार बनवितात, ज्यांना हे समजतं की तुम्ही छोटे आहात आणि तुमच्याकडे ही अनुभव आणि विचार आहे, तुम्हालाही काही तरी सांगायचे आहे, तुमच्या जवळही सांगण्यासारखे काही आहे, जे ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रीयेला अक्कल शिकवणं समजत नाहीत तर त्यांच्या साठी चर्चेतून ज्ञानार्जन करतात. जे तुम्हाला ठरवून दिलेल्या उत्तरांचे पाठांतर करायला नाही सांगत. जे तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतात आणि प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकवतात. NYYYY)