पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बरीच मोठी माणसं छोटयांकडून काही शिकू इच्छित नाहीत. त्यांचे ठाम मत असतंकी लहानांनी काही शिकवायचं नाही. परंतू सत्य तर हे आहे की, मोठयांना लहानांकडून खूप शिकावं लागतं. उदा. कॉम्प्युटर, एस.एम.एस । करणे या गोष्टी छोटयां कडूनच मोठयांना शिकाव्या लागल्या. युवा पिढीच्या गोष्टी ऐकाल किंवा त्यांच्या कडून काही नव्या गोष्टी शिकाल तर सुंदर आणि समतेवर आधारलेले नाते तयार होवू शकते. त्यामुळे युवा पिढी चा उत्साह वाढेल, आत्मसन्मान वाढेल, ती अधिक जबाबदारीने वागतील. मोठ्या माणसांचे त्यामुळे थोडे ओझेही हलके होईल. मोठेपणाचं ओझं हे विनाकारण वागवले जाते, ते दूर होईल आणि युवा पिढीला विचार करायला, निर्णय घेण्यामध्ये सहभागी करुन घेता येईल. त्यामुळे कुटुंबामध्ये लोकशाहीची सुरुवात होईल. छोटे-मोठे सर्वांनाच आपले मत व्यक्त करण्याचा, शिकण्याचा आणि शिकविण्याचा हक्क मिळाला पाहिजे. मोठी माणसं आणखीन एक गडबड करतात. आपल्या मुलांच्या मित्रां विषयी त्यांच्या मनात राग असतो.