पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संस्कृती आणि परंपरांच्या नावाखाली युवा पिढीची अडवणूक केली जाते. कोणी युवक युवती आपल्या जाती बाहेर, विचाराने, आवडीने लग्न करु पहात असेल तर त्यांची हत्या केली जाते. जाती भेद कायद्याने गुन्हा आहे. मुलींना क मी लेखणं हा ही कायद्याने गुन्हा आहे. पण आपल्या परंपरा हया जातीय भेदभावावर आधारलेल्या आहेत. या परंपरा बदलून टाकल्या पाहिजेत. 'लकीर के फकीर' बनणं योग्य नाही. परंपरा आणि संस्कृती मधील चांगल्या गोष्टी स्विकारा. परंतू त्यातील भेदभाव, उच्च निच सोडून द्या. असं घडलं तर दोन पिढ्यांमधील ताण-तणाव व द्वंद्व कमी होईल. आपण घरातील युवा पिढीला भाषण देतो, त्यांच्याशी गप्पा नाही मारत,१५ ते २४ वयो- गटाला काही समजत नाही असं समजणं, हा वेडेपणा मोठी माणसं करतात. युवा पिढीने फक्त ऐकून घेतलं पाहिजे, बोललं नाही पाहिजे, मान ठेवला पाहिजे अशी । मोठयांची अपेक्षा असते. उलट उत्तर देतेस, आदर ठेवत नाही. शब्दाला शब्द वाढतो आहे, मोठयांची ही वाक्ये युवा पिढीला गप्प बसविते, खोटे बोलायला भाग पाडते, त्यामुळे समानतेवर आधारलेले, सत्त्याचा स्विकार करणारे नाते तयार होवू शकत नाही.