पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुमचे मित्र तुम्हाला । बिघडवतात, कसले ते मित्र ?" असं बोललं जातं. काही मित्रांमुळे 57 आपण बिघडतो हे खरे आहे, पण सगळेच काही तसे नसतात. मित्र आणि मैत्री जीवनात अत्यावश्यक गोष्टी आहेत आणि मैत्री आणि मित्रांसाठी वेळ दिलाच पाहिजे. | मोठ्या माणसांजवळ अनुभव असतो हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल. जिथे ज्या वळणावर तुम्ही उभे आहात ते मोठयांच्या ही जीवनात आले होते. त्यामुळे ते जे काही बोलतात ते ऐकून घेण्यामध्ये फायदा आहे. त्यामुळे मोठ्या माणसांवर नाराज नका होवू, पण हे लक्षात असू दया की मोठ्या माणसांमध्येही त्रुटी आहेत, कमतरता आहेत. मोठे लोक देवदेवता नाहीत. आपल्या आई वडिलांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांच्यातील चांगुलपणा लक्षात घ्या. हे लक्षात घ्या की, ते तुमचं भलं करु इच्छितात. त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्या सोबत प्रामाणिक आणि चांगल नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करा, ती * तुमची जबाबदारी आहे.